Thursday, February 7, 2013

प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा
(चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा)
 
१) गुलाबाच्या झाडाला कधीच फळ धरत नाही.
चूक. क्वचित धरते.
२) मासा या प्राण्याची विष पचविण्याची क्षमता माणसाच्या क्षमतेच्या कैकपट असते.
बरोबर (७०० पट पर्यंत )
३) एक किडा नाकावर बसून नाक तोडतो म्हणून त्याला नाकतोडा म्हणतात.
चूक. तो स्वत:चेच नाक (तोडत) ओढत असताना दिसतो.
४) पाणी १००% शुद्ध राहू शकत नाही.
बरोबर
५) सेटेलाईट टिव्हीची अन्टेना उत्तर ध्रुवाकडे रोखलेली असते.
चूक. सेटेलाईट कडे. 
६) वादळ येण्यापूर्वी पाणी उकळायला वेळ कमी लागतो.
बरोबर  
७) उसाला सर्वात जास्त पाणी लागते म्हणून ऊस अधिक पावसाच्या प्रदेशात उगवतो.
चूक. - सिंचनाची सोय असलेल्या प्रदेशात -
८) सजीवाच्या शरीरात किरणोत्सारी पदार्थ असतातच.
बरोबर
९) भागाकार म्हणजे तितक्यांदा केलेली बेरीज.
चूक. (बेरीज नव्हे) वजाबाकी / (भागाकार नव्हे) गुणाकार
१०) बुडबुडा पाण्यातून वर येताना मोठा मोठा होतो.
बरोबर
प्र. २  थोडक्यात उत्तरे लिहा. 
 
१) उजेडात आहे पण अंधारात नाही, असे काय?
सावली / छाया - प्रकाश
२) भारतात १४ जानेवारीच्या आसपास कोणकोणते सण असतात?
संक्रांत, भोगी, किंक्रांत, उत्राण, भोगली बिहू, लोहाडी, माघी, सुकारात, घुघुतीया, खिचीरी, पोंगल, सोन्ग्क्रांत, ई.
३) हवामान शास्त्रज्ञांना हवेतील कोणते पाच घटक महत्वाचे वाटतात?
तापमान, दाब, बाष्प, वा-याची दिशा, पाऊस
४) पृथ्वीवर पृथ्वीच्या मध्यापासून सर्वात लांब असणा-या ठिकाणाचे नाव काय?
किली मांजारो (टांझानिया)
५) कोणत्या वनस्पतीची पाने खाल्ल्यावर साखर गोड लागत नाही?  
बेडकीचा पाला
६) गेल्या २० वर्षात कोणत्या वाळवंटाचे क्षेत्र कमी झाले आहे?
सहारा
७) मातीच्या वरच्या थरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा अधातू कोणता?
सिलिकॉन
८) दुस-या वनस्पतीवर वाढणा-या वनस्पतीला काय म्हणतात?
परजीवी / बांडगुळ
९) मांज-या दगडाचा रंग कोणता असतो? 
राखाडी काळा
१०) आपल्या आहारात नियमित असणारा पण येथे न पिकणारा पदार्थ कोणता?
हिंग
 
प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा. 
१) पोस्टाच्या ५ रु. किमतीच्या पाकिटाची लांबी २२ सें.मी. रुंदी ११ सें.मी. असते
२) खेळाच्या पत्त्यांमधील चौकट राजाच्या हातात शस्त्र नसते.
३) २००९ मध्ये १३ पौर्णिमा होत्या. २०१० मध्ये १२ पौर्णिमा आहेत.
४) मोराच्या गळा व मानेच्या भागाचा रंग मोरपंखी असतो.
५) उंबराची फळे उंबराच्या वृक्षाच्या खोडावर येतात?
६) घड्याळात मिनिट काटा सहावर असताना १०:३०, ११:३०, १२:३०, १३:३० १४:30  वाजता त्याचा तास काट्याशी होणारा कोन १३५ अंशापेक्षा जास्त असतो.
७) सायकलची उंची आणि पाया यांचे गुणोत्तर सुमारे ०.८४ येते. लिहा. (कंपनी आणि मोडेल प्रमाणे ते बदलते )
८) घरात एका बशीत सकाळी ८ वाजता ८ चमचे पाणी ठेवले तर रात्री ८ वाजता त्यातले शिल्लक राहिलेले पाणी किती. वारंवार करून पाहून ठरवावे लागेल पण अगदी ८ चमचे नाहीच नाही. (अनेकांनी तापमान, वारा, बशीचा खोलगटपणा, पृष्टभागाचे, क्षेत्रफळ वगैरे अनेक बाबींवर याचे उत्तर कसे बदलते ते लिहिले आहे.)
९) विकस व्हेपोरब या मलमात कोणती औषधी द्रव्ये आहेत? मेंथोल - अस्मानतारा, कापूर, निलगिरी, ओवा, जाई मुख्यत:
१०) तुमच्या डाव्या हाताच्या फक्त मधल्या बोटाचे टोक तळहातावर टेकले असता इतर बोटे कोणत्या स्थितीत असतात त्याची समोरून आणि बाजूने दिसणारी आकृती काढा. (प्रत्येकाने चांगला प्रयत्न केला आहे)
 

Monday, January 4, 2010

Science Quiz in Marathi: Vidnyan Ranjan Spardha 2010

सप्रेम नमस्कार
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विज्ञान रंजन स्पर्धा होत आहे.
या स्पर्धीची प्रश्नावली सोबत पाठवत आहे.
आपल्याला आवडेल, मजा येईल.
त्यासाठी आपणाकडून पुढील पैकी एक वा अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
· आपण ही प्रश्नावली स्वत: सोडवावी.
· स्पर्धेत भाग घेण्यासाठी इतरांना प्रवृत्त करावे.
· जास्तीत जास्त मित्र मंडळींपर्यंत ती पोचवावी.
· आपल्या ओळखीच्या प्रसार माध्यमातून तिचा प्रसार होईल असा प्रयत्न करावा.
· प्रश्नावली सोडविण्याचा उत्तम प्रयत्न करणा-यांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन पाळण्यासाठी आर्थक मदत करावी अथवा उपलब्ध करून द्यावी
· शक्य असल्यास आपल्या अन्य भाषिक मित्रांना त्या त्या प्रादेशिक भाषेत भाषांतर करून प्रसार करायला सांगता येईल.
मी आपल्याकडे बरेच सहकार्य मागितले आहे. तुम्ही कराल ते ते सहकार्य वैज्ञानिकतेच्या संवर्धनासाठी मोलाचेच असणार आहे.
विनय र. र.
कार्यावाह, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
सर्वांसाठी खुली .
विज्ञान रंजन स्पर्धा २०१०
नियमावली
· ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
· प्रवेशमूल्य नाही.
· खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मानाने, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील
· जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून २० फेब्रुवारी २०१० पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक सरक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०.
· उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे.
· २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी विजेत्यांची नावे जाहीर केली जातील
· शिक्षण आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना पुढील प्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत(१०), सातवीपर्यंत(९), दहावीपर्यंत(७), बारावीपर्यंत(५), पदवी(३) शास्त्रशाखा(०).
वय वर्षे: १३ पर्यंत(६), १४ ते १६(४), १७ ते २०(२), ४१ ते ६०(२), ६१ ते ८०(४), ८१ हून जास्त (६)
· आपल्या उत्तरपत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर पुढील माहिती लिहून पाठवावी- १. संपूर्ण नाव, २. पत्ता, ३. दूरध्वनी, ४. ई-मेल, ५. जन्मतारीख, ६. शिक्षण, ७. व्यवसाय, ८. पुढावा गुण.
· परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क करावा. कार्यवाह, म. वि. प., पुणे - विनय र. र., ९४२२०४८९६७, ई-मेल mavipa.pune@gmail.com
प्रश्नावली
प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा . (गुण १०)
  1. पोस्टाच्या ५ रु. किमतीच्या पाकिटाची लांबी रुंदी किती असते?
  2. खेळाच्या पत्त्यांमधील कोणत्या राजाच्या हातात शस्त्र नसते?
  3. २००९ मध्ये किती पौर्णिमा होत्या? २०१० मध्ये किती पौर्णिमा आहेत?
  4. मोराच्या नेमक्या कोणत्या भागाचा रंग मोरपंखी असतो?
  5. उंबराची फळे उंबराच्या वृक्षाच्या नेमक्या कोणत्या भागावर येतात?
  6. घड्याळात मिनिट काटा सहावर असताना किती वाजता त्याचा तास काट्याशी होणारा कोन १३५ अंशापेक्षा जास्त असतो?
  7. सायकलची उंची आणि पाया यांचे गुणोत्तर लिहा. (कंपनीचे नाव आणि मोडेलचे नाव लिहा)
  8. घरात एका बशीत सकाळी ८ वाजता ८ चमचे पाणी ठेवले तर रात्री ८ वाजता त्यातले शिल्लक राहिलेले पाणी किती?
  9. विकस व्हेपोरब या मलमात कोणती औषधी द्रव्ये आहेत?
  10. तुमच्या डाव्या हाताच्या फक्त मधल्या बोटाचे टोक तळहातावर टेकले असता इतर बोटे कोणत्या स्थितीत असतात त्याची समोरून आणि बाजूने दिसणारी आकृती काढा.
प्र. २ थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण १०)
  1. उजेडात आहे पण अंधारात नाही, असे काय?
  2. भारतात १४ जानेवारीच्या आसपास कोणकोणते सण असतात?
  3. हवामान शास्त्रज्ञांना हवेतील कोणते पाच घटक महत्वाचे वाटतात?
  4. पृथ्वीवर पृथ्वीच्या मध्यापासून सर्वात लांब असणा-या ठिकाणाचे नाव काय?
  5. कोणत्या वनस्पतीची पाने खाल्ल्यावर साखर गोड लागत नाही?
  6. गेल्या २० वर्षात कोणत्या वाळवंटाचे क्षेत्र कमी झाले आहे?
  7. मातीच्या वरच्या थरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा अधातू कोणता?
  8. दुस-या वनस्पतीवर वाढणा-या वनस्पतीला काय म्हणतात?
  9. मांज-या दगडाचा रंग कोणता असतो?
  10. आपल्या आहारात नियमित असणारा पण येथे न पिकणारा पदार्थ कोणता?
प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) (गुण १०)
  1. गुलाबाच्या झाडाला कधीच फळ धरत नाही.
  2. मासा या प्राण्याची विष पचविण्याची क्षमता माणसाच्या क्षमतेच्या कैकपट असते.
  3. एक किडा नाकावर बसून नाक तोडतो म्हणून त्याला नाकतोडा म्हणतात.
  4. पाणी १००% शुद्ध राहू शकत नाही.
  5. सेटेलाईट टिव्हीची अन्टेना उत्तर ध्रुवाकडे रोखलेली असते.
  6. वादळ येण्यापूर्वी पाणी उकळायला वेळ कमी लागतो.
  7. उसाला सर्वात जास्त पाणी लागते म्हणून ऊस अधिक पावसाच्या प्रदेशात उगवतो.
  8. सजीवाच्या शरीरात किरणोत्सारी पदार्थ असतातच.
  9. भागाकार म्हणजे तितक्यांदा केलेली बेरीज.
  10. बुडबुडा पाण्यातून वर येताना मोठा मोठा होतो.
प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)
  1. हलवा काटेरी असतो.
  2. छापील कागदात घेऊन तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
  3. ई-मेल पत्त्यामध्ये @ हे चिन्ह असतेच.
  4. शस्त्रक्रिया करताना डॉक्टर नाकातोंडावर कापडी मुखवटा लावतात.
  5. हिंदू पंचांगात कधी कधी वर्षात १३ महिने येतात.
  6. आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यावर ते गोड लागते.
  7. कंकणाकृती सूर्यग्रहण फारच कमी वेळा दिसते.
  8. माणसाचे हात चालताना खाली तर पळताना वर असतात.
  9. बोटे मोडताना कड कड आवाज येतो.
  10. हत्ती आपले कान सतत हलवत असतो.
प्र. ५ सविस्तर उत्तरे लिहा (गुण १५)
  1. धिरडे, घावन, आंबोळी, डोसा, उत्तप्पा यात फरक काय?
  2. थंडीमुळे अगर भीतीमुळे - अंगावर काटा येतो, म्हणजे नेमके काय होते? त्यामुळे शरीराला कोणता फायदा होतो?
  3. एच१एन१ असे नाव असणा-या जीवाणूच्या नावातील एच आणि एन चे स्पष्टीकरण करा.
  4. जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बियाणांवर कोणकोणते आक्षेप घेतले जातात?
  5. पेन ड्रIईव्ह मध्ये इलेक्ट्रोनिक माहिती कशी साठवली जाते?
प्र. ६ करून पहा उत्तर लिहा (गुण २०)
  1. "माणसाला बत्तीस दात असतात" या वाक्याचा पडताळा किमान १० व्यक्तींचे दात मोजून घ्या. अपवाद आढळल्यास त्याचे कारण नोंदवा.
  2. अखंड सुतळीच्या सहाय्याने अ, , , , , , , ढ र, क्ष ही मुळाक्षरे ५ सें. मी. उंचीची होतील अशी वळणदारपणे काढा. प्रत्येक अक्षरास किती लांबीची सुतळी लागली ते लिहा.
प्र. ७ स्पष्टीकरणासह सोडवा (गुण १५)
  1. माझ्याकडे काही पेढे आहेत. दहा जणांना सारखे वाटले तर दोन उरतात, पंधरा जणांना सारखे वाटले तरी दोन उरतात, वीस जणांना सारखे वाटले तरी दोनच उरतात, पाच जणांना सारखे वाटले तर किती उरतील?
  2. एका टेकडीवरून एकाने सूर्योदयाचा देखावा बघितला. त्या वेळी त्याला समोरच्या डोंगरामागे बरोब्बर अर्धे सूर्यबिंब दिसले. टेकडीच्या पायाथ्याशी असलेल्याने ७० सेकंदानंतर सूर्योदय बघितला तेव्हा त्यालाही समोरच्या डोंगरामागे अर्धेच सूर्यबिंब दिसले. तर टेकडीची उंची किती?
  3. आठवड्यातल्या कोणत्या तरी तीन वारांची नावे एका गुप्त लिपीत - फ:किही, कुयै, पूदि - अशी लिहिली जातात. त्यातील संकेत शोधा. तोच संकेत वापरून सर्व वारांची नावे क्रमाने लिहा. ( रवि, सोम इ.)
प्र. ८ वैज्ञानिक कथा लिहा (गुण २०)
कल्पना करा की चंद्रावर माणसासारखे सजीव - "चांदेरे" - खोल द-यांमध्ये राहतात.
ते कालगणना करतात, आकाश निरीक्षण करतात, त्यांच्या आकाशातली सर्वात मोठी चांदणी म्हणजे पृथ्वी.
या "चांदेरे" लोकांमध्ये पृथ्वीला अनुसरून कोणत्या कथा, समजुती, कल्पना असतील? या बाबत प्रत्येकी ३०० शब्दांपर्यंत तीन छोट्या छोट्या गोष्टी लिहा.