Monday, January 4, 2010

Science Quiz in Marathi: Vidnyan Ranjan Spardha 2010

सप्रेम नमस्कार
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विज्ञान रंजन स्पर्धा होत आहे.
या स्पर्धीची प्रश्नावली सोबत पाठवत आहे.
आपल्याला आवडेल, मजा येईल.
त्यासाठी आपणाकडून पुढील पैकी एक वा अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
· आपण ही प्रश्नावली स्वत: सोडवावी.
· स्पर्धेत भाग घेण्यासाठी इतरांना प्रवृत्त करावे.
· जास्तीत जास्त मित्र मंडळींपर्यंत ती पोचवावी.
· आपल्या ओळखीच्या प्रसार माध्यमातून तिचा प्रसार होईल असा प्रयत्न करावा.
· प्रश्नावली सोडविण्याचा उत्तम प्रयत्न करणा-यांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन पाळण्यासाठी आर्थक मदत करावी अथवा उपलब्ध करून द्यावी
· शक्य असल्यास आपल्या अन्य भाषिक मित्रांना त्या त्या प्रादेशिक भाषेत भाषांतर करून प्रसार करायला सांगता येईल.
मी आपल्याकडे बरेच सहकार्य मागितले आहे. तुम्ही कराल ते ते सहकार्य वैज्ञानिकतेच्या संवर्धनासाठी मोलाचेच असणार आहे.
विनय र. र.
कार्यावाह, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
सर्वांसाठी खुली .
विज्ञान रंजन स्पर्धा २०१०
नियमावली
· ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
· प्रवेशमूल्य नाही.
· खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मानाने, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील
· जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून २० फेब्रुवारी २०१० पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक सरक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०.
· उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे.
· २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी विजेत्यांची नावे जाहीर केली जातील
· शिक्षण आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना पुढील प्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत(१०), सातवीपर्यंत(९), दहावीपर्यंत(७), बारावीपर्यंत(५), पदवी(३) शास्त्रशाखा(०).
वय वर्षे: १३ पर्यंत(६), १४ ते १६(४), १७ ते २०(२), ४१ ते ६०(२), ६१ ते ८०(४), ८१ हून जास्त (६)
· आपल्या उत्तरपत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर पुढील माहिती लिहून पाठवावी- १. संपूर्ण नाव, २. पत्ता, ३. दूरध्वनी, ४. ई-मेल, ५. जन्मतारीख, ६. शिक्षण, ७. व्यवसाय, ८. पुढावा गुण.
· परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क करावा. कार्यवाह, म. वि. प., पुणे - विनय र. र., ९४२२०४८९६७, ई-मेल mavipa.pune@gmail.com
प्रश्नावली
प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा . (गुण १०)
  1. पोस्टाच्या ५ रु. किमतीच्या पाकिटाची लांबी रुंदी किती असते?
  2. खेळाच्या पत्त्यांमधील कोणत्या राजाच्या हातात शस्त्र नसते?
  3. २००९ मध्ये किती पौर्णिमा होत्या? २०१० मध्ये किती पौर्णिमा आहेत?
  4. मोराच्या नेमक्या कोणत्या भागाचा रंग मोरपंखी असतो?
  5. उंबराची फळे उंबराच्या वृक्षाच्या नेमक्या कोणत्या भागावर येतात?
  6. घड्याळात मिनिट काटा सहावर असताना किती वाजता त्याचा तास काट्याशी होणारा कोन १३५ अंशापेक्षा जास्त असतो?
  7. सायकलची उंची आणि पाया यांचे गुणोत्तर लिहा. (कंपनीचे नाव आणि मोडेलचे नाव लिहा)
  8. घरात एका बशीत सकाळी ८ वाजता ८ चमचे पाणी ठेवले तर रात्री ८ वाजता त्यातले शिल्लक राहिलेले पाणी किती?
  9. विकस व्हेपोरब या मलमात कोणती औषधी द्रव्ये आहेत?
  10. तुमच्या डाव्या हाताच्या फक्त मधल्या बोटाचे टोक तळहातावर टेकले असता इतर बोटे कोणत्या स्थितीत असतात त्याची समोरून आणि बाजूने दिसणारी आकृती काढा.
प्र. २ थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण १०)
  1. उजेडात आहे पण अंधारात नाही, असे काय?
  2. भारतात १४ जानेवारीच्या आसपास कोणकोणते सण असतात?
  3. हवामान शास्त्रज्ञांना हवेतील कोणते पाच घटक महत्वाचे वाटतात?
  4. पृथ्वीवर पृथ्वीच्या मध्यापासून सर्वात लांब असणा-या ठिकाणाचे नाव काय?
  5. कोणत्या वनस्पतीची पाने खाल्ल्यावर साखर गोड लागत नाही?
  6. गेल्या २० वर्षात कोणत्या वाळवंटाचे क्षेत्र कमी झाले आहे?
  7. मातीच्या वरच्या थरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा अधातू कोणता?
  8. दुस-या वनस्पतीवर वाढणा-या वनस्पतीला काय म्हणतात?
  9. मांज-या दगडाचा रंग कोणता असतो?
  10. आपल्या आहारात नियमित असणारा पण येथे न पिकणारा पदार्थ कोणता?
प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) (गुण १०)
  1. गुलाबाच्या झाडाला कधीच फळ धरत नाही.
  2. मासा या प्राण्याची विष पचविण्याची क्षमता माणसाच्या क्षमतेच्या कैकपट असते.
  3. एक किडा नाकावर बसून नाक तोडतो म्हणून त्याला नाकतोडा म्हणतात.
  4. पाणी १००% शुद्ध राहू शकत नाही.
  5. सेटेलाईट टिव्हीची अन्टेना उत्तर ध्रुवाकडे रोखलेली असते.
  6. वादळ येण्यापूर्वी पाणी उकळायला वेळ कमी लागतो.
  7. उसाला सर्वात जास्त पाणी लागते म्हणून ऊस अधिक पावसाच्या प्रदेशात उगवतो.
  8. सजीवाच्या शरीरात किरणोत्सारी पदार्थ असतातच.
  9. भागाकार म्हणजे तितक्यांदा केलेली बेरीज.
  10. बुडबुडा पाण्यातून वर येताना मोठा मोठा होतो.
प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)
  1. हलवा काटेरी असतो.
  2. छापील कागदात घेऊन तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
  3. ई-मेल पत्त्यामध्ये @ हे चिन्ह असतेच.
  4. शस्त्रक्रिया करताना डॉक्टर नाकातोंडावर कापडी मुखवटा लावतात.
  5. हिंदू पंचांगात कधी कधी वर्षात १३ महिने येतात.
  6. आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यावर ते गोड लागते.
  7. कंकणाकृती सूर्यग्रहण फारच कमी वेळा दिसते.
  8. माणसाचे हात चालताना खाली तर पळताना वर असतात.
  9. बोटे मोडताना कड कड आवाज येतो.
  10. हत्ती आपले कान सतत हलवत असतो.
प्र. ५ सविस्तर उत्तरे लिहा (गुण १५)
  1. धिरडे, घावन, आंबोळी, डोसा, उत्तप्पा यात फरक काय?
  2. थंडीमुळे अगर भीतीमुळे - अंगावर काटा येतो, म्हणजे नेमके काय होते? त्यामुळे शरीराला कोणता फायदा होतो?
  3. एच१एन१ असे नाव असणा-या जीवाणूच्या नावातील एच आणि एन चे स्पष्टीकरण करा.
  4. जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बियाणांवर कोणकोणते आक्षेप घेतले जातात?
  5. पेन ड्रIईव्ह मध्ये इलेक्ट्रोनिक माहिती कशी साठवली जाते?
प्र. ६ करून पहा उत्तर लिहा (गुण २०)
  1. "माणसाला बत्तीस दात असतात" या वाक्याचा पडताळा किमान १० व्यक्तींचे दात मोजून घ्या. अपवाद आढळल्यास त्याचे कारण नोंदवा.
  2. अखंड सुतळीच्या सहाय्याने अ, , , , , , , ढ र, क्ष ही मुळाक्षरे ५ सें. मी. उंचीची होतील अशी वळणदारपणे काढा. प्रत्येक अक्षरास किती लांबीची सुतळी लागली ते लिहा.
प्र. ७ स्पष्टीकरणासह सोडवा (गुण १५)
  1. माझ्याकडे काही पेढे आहेत. दहा जणांना सारखे वाटले तर दोन उरतात, पंधरा जणांना सारखे वाटले तरी दोन उरतात, वीस जणांना सारखे वाटले तरी दोनच उरतात, पाच जणांना सारखे वाटले तर किती उरतील?
  2. एका टेकडीवरून एकाने सूर्योदयाचा देखावा बघितला. त्या वेळी त्याला समोरच्या डोंगरामागे बरोब्बर अर्धे सूर्यबिंब दिसले. टेकडीच्या पायाथ्याशी असलेल्याने ७० सेकंदानंतर सूर्योदय बघितला तेव्हा त्यालाही समोरच्या डोंगरामागे अर्धेच सूर्यबिंब दिसले. तर टेकडीची उंची किती?
  3. आठवड्यातल्या कोणत्या तरी तीन वारांची नावे एका गुप्त लिपीत - फ:किही, कुयै, पूदि - अशी लिहिली जातात. त्यातील संकेत शोधा. तोच संकेत वापरून सर्व वारांची नावे क्रमाने लिहा. ( रवि, सोम इ.)
प्र. ८ वैज्ञानिक कथा लिहा (गुण २०)
कल्पना करा की चंद्रावर माणसासारखे सजीव - "चांदेरे" - खोल द-यांमध्ये राहतात.
ते कालगणना करतात, आकाश निरीक्षण करतात, त्यांच्या आकाशातली सर्वात मोठी चांदणी म्हणजे पृथ्वी.
या "चांदेरे" लोकांमध्ये पृथ्वीला अनुसरून कोणत्या कथा, समजुती, कल्पना असतील? या बाबत प्रत्येकी ३०० शब्दांपर्यंत तीन छोट्या छोट्या गोष्टी लिहा.

5 comments:

  1. Good one. This science quiz will enable participants to increase their abilities and skills required for better understanding of science.

    ReplyDelete
  2. विज्ञान रंजन स्पर्धा 2010 निकाल
    बक्षीस विजेत्यांची यादी-
    अतिविशेष गुणवत्ता धारक: (२४) + विशेष गुणवत्ता धारक (४२) + प्रथम वर्ग धारक (६६)

    अतिविशेष गुणवत्ता धारक: (२४)
    १) निरंजन चंद्रकांत गुन्नाल
    ११२६ नाना पेठ, कैकड गल्ली, पुणे ४११००२ / आबासाहेब अत्रे प्रशाला / ९०९६५६६३६५
    २) इरा यशवंत लिमये
    राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, अंबडवेट, कासार आंबोली, जि. पुणे. / ९८८९९४९००३ / 10limbu@gmail.com
    ३) सानिका खारकर
    बी-२/१२ सिंधिया सोसायटी, सर एम व्ही रोड, अंधेरी (पू.), मुंबई ४०००६९ / sanikakharkar@gmail.com
    4) मृणाल कुलकर्णी
    पिकासो विला, सत्यानंद हॉस्पिटल जवळ, कोंढवा, पुणे ४११०४८ / ९८९०८९८००३ / mrunal1362@rediffmail.com
    ५) करण सौंदाणे
    २ अगस्ती अपा. बी. विंग जीवदाणी रोड, गणेश मंदिराजवळ, विरार (पूर्व) जि. ठाणे ९८६०९६८४९१
    ६) पुष्कर डोंगरे
    अ-३० कर्नाटक सोसायटी, मोगल लेन, माहीम, मुंबई ४०००१६ / ०२२२४३२३३७० / dongrepushkar@gmail.com
    ७) स्नेहल पांडुरंग गोसावी
    सुंदराबाई राठी विद्यालय, खराडी, पुणे ४१११०१४ / ९६५७६३३४०६
    ८) अमला कुंदन राउत
    मांगल्य हॉटेल, हिल झील जवळ, बोरीगाव, पो. बोर्डी, ता. डहाणू, जि, ठाणे ४०१७०१ / ९३७२६८३२६६
    ९) अक्षय महादेवजी चान्देवार
    'त्रिमूर्ती; सूर्यकेतू नगर, रावत रोड, भंडारा / ९९७५४५१२८७
    १०) सरस्वती सुदाम शेळके
    रिब मिल रोड, RB- IV/ MS-1 -578 कवा. नं. १, पुणे ४११००९ / ९८६७९१०५०३
    ११) कोल्हे स्नेहल तानाजी
    सुंदराबाई राठी विद्यालय, खराडी, पुणे ४१११०१४ / ९८८१०६७२८७
    १२) वाघेला मानसी
    आबासाहेब पवार नगर, सांगवी, पुणे ४११०२७ / ९८५०९५९६२०
    १३) कुशन विठ्ठल देशपान्डे
    स्वामी सह. गृह. संस्था, मोहन नगर, धनकवडी, पुणे ४११०४३ / ८१४९१२४८३१
    १४) राजूल संजय भटेवरा
    श्री ओम सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे ४११०१४ / ९२७०७९३७०७
    १५) सुधीर कल्याणराव देशपान्डे
    ३२.२ ब एरंडवन, "रसिक" श्रम साफल्य सोसायटी, पुणे ४११००४
    १६) गौतम दादू धनवडे
    मु. अंबाडी पो. दिघाशी ता. भिवंडी जि. ठाणे. ४२१३०२ / ९०४९५४१८९७
    १७) सुतार जयश्री आनंदा
    नर्हे, वडगाव-धायरी, कन्हैयालाल कंपनी समोर, सिंहगड रोड, पुणे ४११०४१ / ९८२२४०२६१७
    १८) सुमेधा मेघ:श्याम कोल्हे
    सुंदराबाई राठी विद्यालय, खराडी, पुणे ४१११०१४ / ९८५०८९२५६४
    १९) निरंजन पाळेकर
    आनंद घन, रविनगर, बोकार रोड, उंबरी, जि. नांदेड / ९४२१८४३१९० /
    nnpalekar@gmail.com
    २०) सुचेता पोतदार
    c -३१ दादलानी पार्क, बाळकुंभ, ठाणे (प) ४००६०८ / ९८६९२७१००७
    २१) पूजा भंडारी
    ४९८ सोमवार पेठ, दारूवाला पूल, पुणे ४११०११ / ९३७०९५०९५५
    २२) उत्कर्षा एखंडे
    स. नं. ४७ गणेशनगर वडगाव शेरी, पुणे ४११०१४
    २३) सायली अगवणे
    ४२/२ ओम सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे ४११०१४
    २४) राजाराम वाघ
    पी ६०३ पिनाक मेमरीज, फेज II कोथरूड, पुणे ४११०३८

    ReplyDelete
  3. विशेष गुणवत्ता धारक (४२)
    १) अदिती बाळकृष्ण गोरे
    ब-४-६०३ लोक्मिलन सोसायटी, चांदिवली, साकी विहार रोड, मुंबई ४०००७२ / ९९३०५८०३८३
    २) क्षितिजा जयंत धामणे
    २ तृप्ती अपा. जीवन छाया एल आय सी कॉलनी, राविद्रनाथ विद्यालायाशेजारी माणिक शा नगर , द्वारका, नाशिक ११ / ९८५०७५१७८१
    ३) रूपाली रमेश पाटील
    मु. पो. कुंदे, ता. भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२ / ०९८६००७७२२१ / rupa162023@yahoo.co.in
    ४) नवले प्रियांका
    सुंदराबाई राठी विद्यालय, खराडी, पुणे ४१११०१४ / ९८८१४०४३५१
    ५) राठोड मितेश कालूसिंग
    संघवी के. एम. हाय स्कूल, पुणे ४११००२
    ६) वाघेला राजेंद्र पी.
    संघवी के. एम. हाय स्कूल, पुणे ४११००२
    ७) विशाखा हेमचंद्र चितळे
    गौरी वामन स्मृती बिल्डींग, पहिला मजला, लक्ष्मी नारायण मंदिरा शेजारी, चिपळूण जि. रत्नागिरी / ०२३५५२५२८४४ / vishakha.chitle@gmail.com
    ८) कल्याणी किशोर कुरणे
    स. नं. ४४/०३ प्रतिक पार्क, चव्हाण नगर, खराडी पुणे ४११०१४ (सुंदराबाई मराठी हायस्कूल)
    ९) सुनिता सुरेश हेगडे
    १०/७४ संगम सोसायटी, न्यू लिंक रोड, आदर्शनगर जोगेश्वरी (प) मुंबई ४००१०२
    १०) मिस्त्री पिंकल जे.
    ६१३ गंज पेठ, व्ही. आर. गायकवाड चाळ, पुणे ४११०४२
    ११) माधवी मधुकर बोरीकर
    १६ अ सावरकरनगर खामला रोड, नागपूर ४४००१५
    १२) आर्वीकर तिलोत्त्तमा राजेश
    बाजीराव रोड, टिळक चौक, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे
    १३) कोठारी डॉली जे.
    बी-२ कृष्णन गार्डन, माणिक बाग, पुणे ४११०५१
    १४) धावडे पूजा संपत
    ४८/३ क्रांतीनगर, गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे ४११०१४
    १५) अंतरिक्ष संजय पाटील
    ४३/१३ वरळी पोलीस कॅम्प शमा क्वार्टर्स, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई ४०००३०
    १६) कोठारी विशाखा जयंतीलाल
    बी-२ कृष्णन गार्डन, माणिक बाग, पुणे ४११०५१
    १७) कमलेश्वरी घन:श्यामभाई छोरीआ
    शिवतीर्थनगर, सुतार घर, कोथरूड, किनारा हॉटेल जवळ, पुणे ४११०३८
    १८) मृणाल आनंद तारे
    ४ब माउली, गुरुदत्त कॉलोनी स्वामी समर्थ केद्राजवळ, जळगाव, ४२५००१
    १९) ऐवळे ज्योती जालिंदर
    रक्षकनगर फेज २, ८/२०३ खराडी, पुणे ४११०१४
    २०) अक्षय लाजरस उपार
    वृंदावन सोसायटी, चान्डोली रोड, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे
    २१) जयती प्रभाकर बोरसे
    प्लॉट ३४ गट ३५ मुक्ताई नगर, जळगाव
    २२) तेजस्वी प्रकाश राजपूत
    डॉ. नायडू हॉस्पिटल सर्व्ह्नत्स क्वार्टर, पुणे ४११००१
    २३) शिंदे गौरी राजू
    ३६३ के. टाईप जवळ, १३ ताडीवाला रोड, मारुती मंदिर, पुणे ४११००१
    २४) धुमाळ सोनाली कुमार
    स. नं. ४१ बायपास रोड, दुर्गामाता मंदिरासमोर, चौधरी वस्ती, खराडी, पुणे ४११०१४
    २५) वाघेला प्रियांका
    ६३३ गंज पेठ, सावधान मंडळामागे, पुणे ४११०४२
    २६) भोर उदय विठ्ठल
    मु. पो. रांजणी, ताल. आंबेगाव, जि, पुणे ४१०५०४
    २७) निरुपमा अरविंद जावळे
    ४९ सुविधा, प्रतापसिंह नगर, सातारा ४१५००३
    २८) विलास भीमा पवार
    शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा, जकातवाडी, सातारा
    २९) निखील मनोहर बजाज
    सोनदरा गुरुकुलम, डोमरी ता. पाटोदा, जि. बीड
    ३०) निकिता मनोज शिंदे
    रूम नं. ३३ (बैठी लाईन) पोलीस लाईन, सोमवार पेठ, पुणे ४११०११
    ३१) नेहा सुरेश बस्तवाडे
    'रामेश्वर कृपा' महाजनी नगर, कलमठ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग
    ३२) विटकर स्वप्नजा बा
    वृंदावन शिक्षक सोसायटी, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे
    ३३) मंजुषा बाळकृष्ण भोळे
    प्लॉट ७, केसरी बिल्डींग, श्रीकृष्ण कॉलोनी, जळगाव
    ३४) जिज्ञासा नंदकिशोर हेडा
    १९/३२ मुक्ताई नगर, जळगाव
    ३५) शाह पूजा मुकेश
    ३७१ गुरुवार पेठ, बच्चू भवन, पुणे ४११०४२
    ३६) अक्षता अशोक लोंढे
    ५९१/बी रास्ता पेठ, मौर्य चेम्बर्स, ताराचंद हॉस्पिटल शेजारी, पुणे ४११०११
    ३७) प्रचीती प्रसाद माडीवाले
    इ-५२ आदित्य नगर, लोकसेवा हनुमान मंदिराजवळ, गाडीतळ, हडपसर, पुणे ४११०२८
    ३८) सागर लक्ष्मण ढाणे
    फोरेस्ट कॉलोनी, गोडोली, सातारा
    ३९) संकल्प गोपाळ महाजन
    बी-१५ अपूर्वा पार्क, अन्नपूर्णा नगर, आधार वाडी चौक, कल्याण, जि. ठाणे
    ४०) पूनम राजघर महाजन
    स. नं. ४९/५ राजश्री कॉलोनी, रोड. नं. ३, वडगाव शेरी, पुणे ४११०१४
    ४१) सकपाळ मृणाली मानाजी
    स. नं. ११८ विठ्ठल वाडी जुना जकात नाका, विवेकानंद वसाहत, सिंहगड रस्ता, पुणे ४११०३०
    ४२) शरदचंद्र यशवंत मालवणकर
    ३/३ श्री सह्याद्री सोसायटी, कै. एस. एम. जोशी मार्ग, कळवा (प), ठाणे ४००६०५

    ReplyDelete
  4. प्रथम वर्ग धारक: (६६)
    १) नाटेकर तन्मयी प्रमोद
    ११ बी संत ज्ञानेश्वर कॉलनी, जि. प. कॉलनी, जळगाव
    २) प्रसन्न रमेश कणसे
    शिंदे बिल्डींग, दोबी मळा, मंचर, जि. पुणे ४१०५०३
    ३) आरती रमेश सकपाळ
    १९७ नवी पेठ, गांजवे चौक, केशव स्मृती २रा मजला, पुणे ४११०३०
    ४) चव्हाण रिंकू
    फातिमानगर, जैन मंदिर, बिग बझारच्या समोर, पुणे
    ५) बारोट राकेश
    ३७१ गुरुवार पेठ, बच्चू भवन वाडा, पुणे ४११००२
    ६) प्रजापती मयुरी
    नेहा कंसट्रकशन, शेवटचा बस स्टाप, धनकवडी , पुणे ४१०४३
    ७) ओगानिया रोहीत सुनील
    राजेंद्रनगर, पी. एम. सी. कॉलनी पुणे ४११०३०
    ८) परमार कीर्ती अशोक
    प्रियदर्शनी नगर, रोड नं. ३, राधाकृष्ण मंदिराजवळ, सांगवी, पुणे ४११०२७
    ९) इंदोरे सोनाली धोंडीभाऊ
    मु. पो. चान्डोली खुर्द ता. आंबेगाव, ई. पुणे ४१०५०३
    १०) चव्हाण अनिल नानू
    शारदाबाई पवार आश्रमशाळा, जकातवाडी, सातारा
    ११) भाग्यश्री किशोर मोरे
    १४६ भिकमचंद जैन नगर, पिंप्राळा रोड, जळगाव
    १२) तन्मय धनंजय जक्का
    २९३ अ शनिवार पेठ, तांबे बोळ, १ ओंकारछाया, पुणे ४११०३०
    १३) विशाल दत्तात्रय आवटे
    सोनदरा गुरुकुलम, डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड
    १४) बाळकृष्ण शिरीष कामात
    मु. पो. हर्चे ता. लांजा, जि. रत्नागिरी ४१६७१०
    १५) प्रितेश सुरेश तायडे
    २०/२ परिवर्तन, जागृती सोसायटी, गिरण पंपिंग रोड, गट १४५, जळगाव ४२५००२
    १६) प्रियांका प्रदीप सावंत
    कडुलकर चाळ कलमठ टेंबवाडी, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग
    १७) राहुल स्वामी शिवराल
    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, मु. पो. करंदी, उपळी, सातारा
    १८) गांजाळे कोमल बाळू
    गांजाळे मळा, मु. पो. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे
    १९) शेख गुलनाज आझाद
    आनंद पार्क ए-१६ गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे ४११०१४
    २०) प्रणिता संजय शिंदे
    ९१ पारडीवाला चाळ, एस/३ सीताराम जाधव मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३
    २१) मयुर गंगाधर गळंगे
    मु. पो. खळद, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०१
    २२) चव्हाण रेवती नितीन
    एस एम आय टी कॉलेज जवळ, ८७/२८ मुक्ताई नगर, जळगाव
    २३) टाव्हरे संगिता दत्तात्रय
    आदर्श माध्यमिक विद्यालय, जारकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
    २४) गौरी संजय पाटील
    १८ ब, साईसदन मानराज पार्क, जळगाव
    २५) निलीमा विनायक केळकर
    ६/११ चंद्रशेखर सोसायटी, सहार रोड, अंधेरी (पू.) मुंबई ४०००६९ nik_kelkar@yahoo.co.in
    २६) नेहा कानिफनाथ घिसरे ( ७वी कमळ)
    रेणुका स्वरूप प्रशाला, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
    २७) राकेश स्वामी शिवराल
    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, मु. पो. करंदी, उपळी, सातारा
    २८) जाधव प्रतिक्षा दादासाहेब
    स. नं. ३८/४ समर्थ कॉलनी, यशवंत नगर, खराडी, पुणे ४११०१४
    २९) कोमल पटेल
    संघवी के. एम हायस्कुल, पुणे ४११००२
    ३०) प्रियदर्शनी सोपान पाटील (५वी अ)
    प. न. लुंकड कन्याशाळा, जळगाव
    ३१) बो-हाडे कोमल दत्तात्रय
    मु. पो. डिंभे खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे
    ३२) हीना सी. शिशांगीन
    पुणे
    ३३) जेठे सविता दिलीप
    माळवाडी, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे

    ReplyDelete
  5. ३४) सायली प्रदीप पाटील
    ४० गणेश कॉलनी, जळगाव
    ३५) देवेश पांडुरंग भरगुडे
    पी. ३०३ वंडरसिटी कात्रज, पुणे ४११०४६
    ३६) सौ. अपर्णा डिके
    ३६७ साने गुरुजी मार्ग, आग्रीपाडा पोलीस ठाण्यासमोर, मुंबई ४०००११ kedardike@yahoo.com
    ३७) टाव्हरे बाळासाहेब बबनराव
    काळभैरवनाथ सौ. ल. बा. बांगर विद्यालय, खडकी (पि.) ता. आंबेगाव, जि. पुणे
    ३८) मोहिते तेजल जयवंत
    सुंदराबाई मराठे विद्यालय, खराडी, पुणे ४११०१४
    ३९) राजपूत महेंद्र चंदनसिंह
    महाबळेश्वर हॉटेल शेजारी, पल्लोड फार्म ३ कविन बंगलो - १ ए, बाणेर रोड, पुणे ४११०४५
    ४०) नरेंद्र दुर्गा दासरी
    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, मु. पो. करंदी, उपळी, सातारा
    ४१) पांचाल सिद्धी
    शारदा निवास, ७१ बालाजी नगर, स. नं. २२, पुणे ४११०४३
    ४२) प्रणय राजेश प्रजापती
    सी-१६-२ राजमुद्रा सोसायटी, गुलाद नगर, धनकवडी, पुणे ४११०४३
    ४३) सोनवणे क्षितिज बापूसाहेब
    ३/२ सरकारी दूध योजना (आरे) क्वार्टर, त्र्यंबक रोड, नाशिक २
    ४४) वृषाली सुनिल शिंदे
    ३२३ नाना पेठ, श्रीराम कॉम्प्लेक्स अरुणा चौक, पुणे ४११००२
    ४५) पियुषा अरविंद पाटील
    द्वारा डॉ. प्रेमराज चौधरी, ६ गंगासागर, ५८/६० शिव कॉलनी, जळगाव
    ४६) अमेया अभिमन्यू आम्बुरे
    ११ शुभदा अपार्टमेंट, वंडर सिटी जवळ, कात्रज, पुणे ४११०४६
    ४७) ऐश्वर्या संजीव भद्रे
    रूम ४, चाळ-२४, दुर्गा देवी मैदानाजवळ, खारदेवनगर, घाटला, चेंबूर, मुंबई ४०००८८
    ४८) वृषाली रविंद्र पांचाळ
    पि. एम. भोईर हाऊस, गोवंडी रेल्वे स्टेशन जवळ, मुंबई ४०००८८
    ४९) कृतिका प्रविण मोती
    ७/३०१ कोहिनूर, विनोबा भावे नगर, एच आय जी कॉलनी जवळ, कुर्ला (प) मुंबई ४०००७०
    ५०) अदिती पद्माकर अग्रेसर
    मधुबन अपार्टमेंट, बी. नं. ३/१ रिंग रोड, जळगाव
    ५१) संस्कृती उमेश सराफ
    १०६ यमन स्वरनगरी, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे ४११०५१ sarafsanskruti@yahoo.co.in
    ५२) पद्मावती मुकुंद कल्पे
    प्लॉट नं. ६, गट नं. ३१/२ शिवम, दत्ता मंदिराजवळ, मुक्ताई नगर, जळगाव
    ५३) अमोल प्रल्हाद मुंडे सोनदरा
    सोनदरा गुरुकुलम, डोमरी ता. पाटोदा, जि. बीड
    ५४) उत्कर्षा संजय मराठे
    प्लॉट नं. १/३ गट नं. ४३ श्री कृष्ण कॉलनी, जळगाव
    ५५) अक्षय रमेश वाघमारे
    शरद चंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, डिंभे, ता. आंबेगाव, जि. पुणे
    ५६) टी. एस. पोपट
    ११९४ शिवाजी नगर, पुणे ४११००५
    ५७) मानमोडे मनिषा उत्तम
    मु. पो. जारकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
    ५८) टांक विभुती रमेशभाई
    गुरव पिंपळे, मोरिया नगर, गल्ली नं. २, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या जवळ, पुणे ४११०२७
    ५९) वाडगे योगेश राजाराम
    आदर्श माध्यमिक विद्यालय, जारकरवाडी, ता.आंबेगाव, जि. पुणे
    ६०) मंदार प्रमोद वाजगे
    रा. प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव, ता. जुन्नर. जि. पुणे
    ६१) ऐश्वर्या ज्ञानेश्वर पाटील
    १३७ गणेश कॉलनी, रामरूप बिल्डींग समोर, जळगाव
    ६२) निकिता राजू मोरे
    श्रमसाफल्य ४२/१ गणेश नगर, वडगाव शेरी, पुणे ४११०१४
    ६३) भगत पूजा डी.
    बी-३, ४०७ अनिता रेसिडन्सी, कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे ४११०४६
    ६४) अंकिता दत्ताराम मोसमकर
    स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुभाषनगर चेंबूर, मुंबई ४०००७१
    ६५) पटेल रसिला
    आर. सी. एम. गुजराती हायस्कूल, कसबा पेठ, पुणे ४११००२
    ६६) उर्वी नटवरलाल पंखावाला
    आर. सी. एम. गुजराती हायस्कूल, कसबा पेठ, पुणे ४११००२


    सर्व बक्षीस विजेत्यांचे अभिनंदन.
    बक्षीस समारंभ शनिवार १३ मार्च रोजी संध्या. ६:३० ला
    टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे ३० येथे होईल.

    ReplyDelete